जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे रविवारी पुण्यात होणार वितरण
वाशिम:-सामाजिक कार्याच्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवुन सर्दैव न्याय देण्याची भुमिका जोपासत असलेले पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना जगदीशब्द फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे आयोजीत केलेल्या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कार’ जाहीर झाला असुन दि.5 जानेवारी पुणे येथे प्रदान होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय क्रांतीज्योती, क्रांतिसुर्य व बापमाणूस पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मोठ्या थाटामाटात होणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक हमालपंचायतीच्या संस्थापक अध्यक्ष माननीय बाबा आढाव माजी सनदी अधिकारी व विचारवंत सुरेश खोपडे, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.नितीन तळपाडे, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे आधी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रक व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी दिली.सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकीय, कलाकार अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येत आहे. राज्यभरातून अनेक पुरस्कारार्थी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कार’जाहीर झाल्याचे पञ जगदिश फाऊंडेशनकडुन प्राप्त झाले आहे.सदर कार्यक्रमामध्ये ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशनही होणार आहे. यावेळी पुरस्काराच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या जागतिक कीर्तीच्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशन ही करण्यात येणार आहे. फक्त 12 महिन्यांमध्ये या पुस्तकाच्या 30 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून जगभरातून या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.