नगर : वकिलांवर कामाचा ताणताणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातून काहीसा दिलासा मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन कौतुकास्पद आहे. बार असोसिएशन अशा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करावे, असे आवाहन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले आहे. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी नुकत्याच विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०० मीटर व पाचशे मीटर धावणे, गोळा फेक, रस्सीखेच, बुद्धिबळ, दोरी वरच्या उड्या मारणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची व क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 

♦️या स्पर्धांमधील विजेत्या वकिलांना जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे, सचिव संदीप शेळके, उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ सुभाष भोर आदींसह न्यायिक अधिकारी व वकील उपस्थित होते.

या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :– १०० मीटर धावणे (पुरुष) प्रथम प्रसाद गांगर्डे व अक्षय नजन, द्वितीय संतोष सिनारे, अक्षय गवारे, अक्षय दांगट, विकास सांगळे, राहुल देशपांडे व ज्येष्ठ विधिज्ञ सतीशचंद्र सुद्रिक. 

५०० मीटर धावणे :– (पुरुष) प्रथम प्रसाद गांगर्डे, द्वितीय मयूर कोल्हे, तृतीय अभिषेक बोराटे व रमेश सुपेकर. 

१०० मीटर धावणे (महिला) : प्रथम प्रांजल मुनोत, द्वितीय राजुल पितळे व तृतीय ज्योती हिमणे. 

५०० मीटर धावणे (महिला) : प्रथम कीर्ती करांडे, द्वितीय प्रांजल मुनोत, तृतीय ऋतुजा फडतरे. दुसरा गट प्रथम अनिता दिघे, द्वितीय सुरेखा भोसले, तृतीय अनुराधा येवले व राणी भुतकर. 

गोळा फेक पुरुष : प्रथम वैभव कदम, नवाज पठाण, शैलेंद्र शिंदे, सारस क्षेत्रे, धनंजय लोकरे व राहुल गायकवाड. 

गोळा फेक महिला : कीर्ती करांडे, अनुराधा येवले, वृषाली तांदळे व भक्ती शिरसाठ. 

बुद्धिबळ : प्रथम अजय तांदळे, द्वितीय धनंजय लोकरे, उत्तेजनार्थ मनोज खेडकर व संदीप खेडकर. 

बुद्धिबळ महिला : प्रथम ज्योती हिमणे, द्वितीय राजुल पितळे व प्रांजल मुनोत, दुसरा गट प्रथम वृषाली तांदळे व स्नेहल गायकवाड. 

दोरी वरच्या उड्या महिला : प्रथम विभागून प्रांजल मुनोत व प्रणाली भुयार, ज्योती हिमणे व स्नेहल गायकवाड. दुसरा गट प्रथम विभागून अनिता दिघे व सुरेखा भोसले, राणी भुतकर व अनुराधा येवले. 

अध्यक्ष नरेश गुगळे यांनी क्रीडा स्पर्धांना सर्व वकिलांनी दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन सहसचिव संजय सुंबे यानी केले. रामेश्वर काराळे यांनी आभार मानले. यावेळी वकील संघटनेच्या महिला सहसचिव ॲड. भक्ती शिरसाठ, खजिनदार ॲड. शिवाजी शिरसाठ, कार्यकारणी सदस्य ॲड. अमोल अकोलकर, ॲड. सारस क्षेत्रे, ॲड. विनोद रणसिंग, ॲड. देवदत्त शहाणे, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. अस्मिता उदावंत आदींसह वकील व महिला वकील उपस्थित होते.