पुणे दि.३०
तहसील कार्यालय पुरंदर आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या आयोजनाने झाला.
सासवड ता. पुरंदर येथील नवीन तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी दौंड -पुरंदर उप विभागीय अधिकारी मा. वर्षा लांडगे मॅडम होत्या.
तर कार्यशाळेत मा. इंद्रजित देशमुख (मा. आयुक्त महाराष्ट्र शासन ) यांनी “ग्राहक संरक्षण कायदा गरज व अंमलबजावणी ” या विषयावर तर ह. भ. प. तुकाराम महाराज निंबाळकर (अध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ) यांनी “ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य “तसेच संघटनेचे राज्य कार्यकारिणी समन्वय समिती अध्यक्ष सतीश साकोरे यांनी ” ग्राहक तक्रार निराकरण करणे ही एक कला “यावर उदबोधन केले.
विकास महाजन (पारोळा जि. जळगांव) मा. अशासकीय सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय मुंबई यांनी ग्राहक संरक्षण कायदयाचा इतिहास सांगीतला.
यावेळी व्यासपीठावर उप विभागीय अधिकारी वर्षा लांडगे मॅडम, पुरंदर तालुका तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी पुरंदर, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱी उत्तम झेंडे, संतोष बापू मगर, संतोष आबा काकडे,ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष कामठे, पुरंदर तालुका अध्यक्ष रामदास मेमाणे, महिला अध्यक्षा पत्रकार छाया नानागुडे,आदि उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रगतीशील शेतकरी सुभाष काळे,शिवाजी सुळके, बबन काळे,बाळासो मगर, रामदास रांजणे,तानाजी कामथे, एम. के. नाना गायकवाड,राजाभाऊ क्षीरसागर,अंकुश कामथे,सुरेश कुंभारकर, सौ. प्रतिभा उत्तम झेंडे, सौ. सुनीता रामदास मेमाणे,सौ. विजयालक्ष्मी संतोष काकडे,परवीन पानसरे,योगेश खुटवड,तुळशीराम काळे,सुखदेव पवार,यांच्यासह पांचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते व शेतकरी ग्राहकांनी भाग घेतला.
सूत्रसंचालन संतोष आबा काकडे यांनी केले तर आभार संतोष बापू मगर यांनी मानले.
