♦️पाथर्डी तालुक्यात अवैध सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


♦️मुकेशकुमार रामनाथ गौतम, (वय २४, हल्ली रा.कसबापेठ, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर), रवि लगड, (रा.खंडोबा माळ, ता.पाथर्डी (फरार), निशांत यादव, (रा.नोएडा, दिल्ली (फरार), निलेश बाळु केळकर, (वय ३५, रा.कसबा पेठ, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर), प्रेम मिश्रा, (रा.अहमदाबाद, गुजरात (फरार), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी परिसरात अवैध तंबाखू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून कारवाई केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896.