♦️रायगाव (ता.करमाळा) शिवारात कर्जत-करमाळा एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पलटी झाली. बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ३६ प्रवाशांपैकी दोन जण गंभीर तर १५ ते २० जण किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यात यश आले. मंगळवारी (ता.३१) सकाळी ११:१५ वाजता कर्जतहून करमाळ्याकडे जाणारी करमाळा आगाराची बस रायगाव (ता.करमाळा) शिवारात आली असता अचानक बसचा स्टेरिंग रॉड तुटला.
♦️ही बाब चालकांच्या लक्षात येताच त्याने बसवर नियंत्रण मिळवत असताना बस पलटी झाली. अचानक झालेल्या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट उडाली. मात्र बसचालक, वाहक आणि रायगावच्या ग्रामस्थांनी तत्काळ मदत कार्य सुरू केल्याने अवघ्या काही काळातच आत अडकलेले प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना तत्काळ करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
📲बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा:9028903896.