दौंड, ता.१ : पुरंदर तालुक्यातील महात्मा फुले यांच्या जन्मगावी खानवडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी संमेलनामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, साहित्य,कला, वैद्यकीय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
यवत ता. दौंड येथील महेश दुर्गे यांना भारतीय जीवन विमा निगम LIC यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल न्यायाधीश वसंतराव पाटील व माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय महात्मा फुले उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य संयोजक दशरथ यादव, राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, देविदास झुरुंगे, संजय सोनवणे, सुशांत जगताप, दीपक पवार, रवींद्र फुले (माजी सरपंच खानवडी), सुनील धीवार (संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद), निमंत्रक छायाताई नानगुडे (सचिव महिला जिल्हा पत्रकार संघ), गौरव विजयराव कोलते (पुरंदर पब्लिसिटीचे अध्यक्ष), राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी, कवी, लेखक सिताराम नरके व अनेक मान्यवर उपस्थित होते.