♦️भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण 

 ♦️चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण भारतातआढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही या व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. बंगळुरुतील  एका रुग्णालयात या बाळावर उपचार सुरु आहेत. तर कर्नाटकमध्ये दुसरी केस मिळाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दोन केसेस सापडल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाली आहे. शहरातील बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

♦️भारतात आढळला एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण

चीनमध्ये आत्तापर्यंत या व्हायरसचे रुग्ण आढळत होते. मात्र बंगळुरुतल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसने ग्रासलं आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती. दरम्यान आता भारतात आठ महिन्यांच्या बाळाच्या रुपाने HMPV या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

♦️एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणे काय ?


ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस हा सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला,ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी,अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषणूचा वाढता प्रभाव पाहाता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत.