धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयांमध्ये 6 जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी ,येडशी येथील पत्रकार श्री. दत्तात्रय पवार , श्री .सल्लाउद्दीन शेख श्री .संतोष खुणे हैदर पटेल, रफिक पटेल याची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित पत्रकारांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकाच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे महत्त्व कु. ज्ञानेश्वरी तौर हिने सांगितले. तर शाळेतील मार्गदर्शक शिक्षक श्री प्रमोद जाधव यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली तसेच त्यांनी समाजासाठी पत्रकारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नलावडे सर, उपमुख्याध्यापक श्री कांबळे सर ,पर्यवेक्षक श्री चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तंजिला पटेल हीने केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189