चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण
जिवती –
संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांच्या विविध गुणांना वाव मिळावा म्हणून स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त कार्यक्रम शामा दादा कोलाम औद्योगीक प्रशिक्षण संस्था जिवती येथे विविध कार्यक्रमासह आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्रमुख तथा प्राचार्य गुनानंद एम वासनिक साहेब यांनी भूषविले तर उद्घाटन सौ. काविताताई आडे नगराध्यक्षा नगर पंचायत जीवती यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सावंत सर प्राध्यापक गोंडवाना महाविद्यालय जिवती व उद्योजक तथा माजी प्रशिक्षणार्थी श्री गोपाल मोहिते ( औ.प्.संस्था जिवती)आणि गटनिदेशक श्री घ्यार सर यांनी मार्गदर्शन केले . श्री योगेश पट्टेवाले सर यांनी सूत्रसंचालन ,श्री विवेक शेंडे सर यांनी प्रास्ताविक आणि श्री रवि जेवाले सर यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी वादविवाद ,वक्तृत्व,निबंध,मैदानी खेळ इत्यादि घेण्यात आले प्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुख्य लिपिक श्री गोतमारे सर, कनिष्ठ लिपिक श्री मलिक सर , भांडारपाल श्री बनसोड सर शिल्पनिदेशक श्री खांडेकर सर, श्री आकाश देवरवाड सर, श्री राम चव्हाण सर, तसेच शिल्पनिदेशिका कू. दीपा मेश्राम मॅडम, कु. सारिका वासेकर मॅडम , आणि शाहीर भुजंग बसवंते इ. कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.