सरपंच व ठेकेदार यांच्या कडून भ्रष्टाचार दाबन्याचा पूर्ण प्रयत्न सुरु
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०२० ते २०२१ या कालावधी मध्ये दलित वस्ती नवबौद्ध योजने साठी पाच लक्ष रुपये एवढा निधी सिमेंट रोड साठी आलेला होता मात्र सरपंच तसेच ठेकेदार यांनी मिलीभगत करून स्वतःच्या वैक्तिक फायद्या साठी हा सिमेंट रोड नवबौद्ध दलित वस्ती चा निधी दलित वस्ती मध्ये न घेता तसेच ग्रामपंचायत च्या हद्दीत गावठाण मध्ये न घेता चक्क गट क्रमांक २ मधील नवीन प्लॉटिंग मध्ये हा निधी वळविण्यात आला हा नवबौद्ध दलित वस्ती चा निधी हेतू पुरस्सर दादागिरी करून कायद्याचे उल्लंघन तसेच पदाचा गैर वापर करून सरपंच व काही इतर पुढारी आणि ठेकेदार यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने व मिलीभगत हुकूमशाही करून हा घोटाळा केलेला आहे ज्या ठिकाणी हा सिमेंट रस्ता बनविला गेला आहे ती गल्ली.वस्ती. दलित वस्ती नवबौध्द कृती आराखड्या मध्ये नाही ही वस्ती पूर्ण मालकीची शेती प्लॉटिंग ची जमीन आहे आणि या ठिकाणी एक ही नव बौद्ध दलित बांधव राहत नसून या ठिकाणी सर्व जनरल समाजाचे रहिवाशी राहतात सरपंच व ठेकेदार आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी दलित नवबौद्ध समाज बांधवांनची दिशाभूल करून फसवणूक केलीली आहे याच सिमेंट रोड संदर्भात दलित बांधवान्नी न्याय हक्कासाठी सोयगाव पंचायत समिती येथे तक्रार दाखल केली होती मात्र या तक्रार ची कोणतीही दाखल घेतली गेली नाही या सिमेंट रोड मध्ये भ्रष्टाचार झालेला असून ही काही अधिकाऱ्यांना चित्रीमिरी देऊन बिल मात्र पूर्ण काढले गेले या हुकूमशाही करणाऱ्यांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला दिसून येत नाही

बऱ्याच दिवसांपासून चौकशी साठी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र अद्याप कोणतीही चौकशी कारवाई झालेली नाही तसेच चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग योजने अंतर्गत ही लाखो रुपयांचे घोटाळे सरपंच व ठेकेदार यांनी करून बिल काढले आहेत जर या प्रकरणी चौकशी झाली तर त्यांच्या वरती कारवाई होऊ शकते त्यामुळे काही नेते पुढारी आणि काही अधिकारी यांच्या दबाव तंत्रामुळे. ही चौकशी दाबन्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे जर या तीन दिवसांमध्ये या प्रकरणी चौकशी झाली नाही तर महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेच्या वतीने लवकरच निर्णय घेऊन २४ जानेवारी ही दिनांक निच्चीत करण्यात येणार आणि या दिवशी सोयगाव पंचायत समिती कार्यालया समोर ढोल बजाओ आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागविण्यात येणार असल्याचे आदिवासी संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी इशारा दिला आहे या २४ जानेवारी होणाऱ्या आंदोलना सदर्भामध्ये लवकरच सोयगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या कडे आंदोलन संदर्भात पत्र देऊन कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले जर या तीन दिवसांमध्ये या तक्रार ची दाखल घेऊन चौकशी न झाल्यास लवकरच ढोल बजाओ आंदोलन संदर्भात पत्र व्यवहार करून २४ जानेवारी रोजी हे आंदोलन छेडण्यात येईल असे सांगण्यात आले या भ्रष्टाचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे हे मात्र नक्की कारण हा भ्रष्टाचार आणि चौकशी दाबन्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे
N TV न्युज मराठी
प्रतिनिधी जब्बार तडवी