चक्क कर्मचारी यांनी हाती घेऊन मोका, घेतला पक्षाच्या प्रचाराचा ठेका
छत्रपती संभाजीनगर : सध्याला महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे विधानसभा मतदानाचे जोराचे वारे वाहू लागलेले आहे त्यात नेते पुढारी आप आपल्या भाषनातून एकमेकांवरती राजकीय घानाघात करून भाषनाच्या माध्यमातून हल्ला बोल करीत आहे त्यात कार्यकर्ते आपल्या जीवाचे रान करून आप आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहे मात्र यातच काही कर्मचारी वर्ग सुद्धा प्रचाराचा ठेका घेऊन जोराच्या प्रचाराला लागलेले दिसून येत आहे या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोग व वरिष्ठ अधिकारी तसेच नियमाचा कायद्याचा कोणताही धक उरलेला दिसून येत नाही सिल्लोड / सोयगाव विधानसभा मतदार संघामध्ये खूप जोराचा प्रचार सुरु आहे या मतदार संघाच्या सीट वरती पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे या मतदार संघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे
एकी कडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षा तर्फे अब्दुल सत्तार हे उमेदवार आहे तर.
दुसरी कडे उद्धव बाळासाहेब ठाकरे
गट शिवसेना पक्षा तर्फे सुरेश बनकर हे उमेदवार आहे अब्दुल सत्तार यांची निशाणी धनुष्य बाण तर बनकर यांची निशाणी मशाल आहे या दोन उमेदवारांमधे काटेकी टक्कर अशी चुरशी ची लढत सुरु असताना त्यात वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सिल्लोड येथील माजी नगर अध्यक्ष बनेखा पठाण यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे यांना ही खूप मोठी पसंती मिळत असून आता या तीन उमेदवारान मधे राजकीय लढाई मधे रंगत वाढलेली आहे
मात्र नेते पुढारी कार्यकर्ते यांच्या पेक्षा सध्याला कर्मचारी यांनी प्रचाराचा ठेका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे कर्मचारी वर्ग बिनधास्त पणे प्रचार रॅली मधे सभा मधे व सोशल मिडीया च्या माध्यमातून कर्मचारी मोठया प्रमानामध्ये पक्षा चा व उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे सद्याला नागरिकांना हा प्रश्न पडलेला आहे कि कर्मचारी यांना नेमकी प्रचारासाठी निवडणूक आयोगाने मुभा दिलेली आहे कि वरिष्ठ अधिकारी यांनी मोकळ चिट्ठी दिलेली आहे कि कर्मचारी हे त्यांच्या मताने मनमानी करून राजकारण करीत आहे व पक्षा च्या उमेदवारांचा सर्रास पणे प्रचार करीत आहे हा मात्र मोठा गंभीर प्रश्न मतदार जनते समोर निर्माण झालेला आहे
- जब्बार तडवी, सोयगाव