नळदुर्ग | प्रतिनिधी आयुब शेख

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शहरातील स्वच्छता, सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मेघना आय. एन. (IPS), प्रभारी अधिकारी, नळदुर्ग पोलीस ठाणे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, बकरी ईद सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, वादग्रस्त पोस्ट किंवा सामाजिक सलोखा बिघडेल अशा कृती टाळाव्यात तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंके, राष्ट्रवादीचे नेते शफी भाई शेख, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, माजी नगराध्यक्ष शहबाज काजी, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, नगरसेवक इमाम भाई शेख, नगरसेवक रिजवान काजी, नगरसेवक गफूर कुरेशी, काँग्रेस शहराध्यक्ष अबदिन कुरेशी तसेच गावातील धर्मगुरू व नागरिक उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सर्वांनी बकरी ईद सण शांततेत, स्वच्छतेसह आणि सामाजिक ऐक्य जपत साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *