section and everything up until
* * @package Newsup */?> ७४ जळगाव परिसरातील शेतात कापूस वेचणी करतांना १० वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू | Ntv News Marathi

झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेची घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ७४ जळगाव परिसरातील रामभाऊ राधाकिसन मुळे यांच्या १९९ गट क्रमांकाच्या शेतात प्रणाली भारत मुळे वय वर्ष १० रा.७४ जळगाव या मुलीवर दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ४:३० वाजे दरम्यान तुरीत लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात प्रणिता ही गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून,उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून

बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.सदरील घटनेने गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत असून.२ महिन्या अगोदर ही याच परिसरात बिबट्या दिसून आल्याने सदरील घटनेची वनविभाग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती.मिळालेल्या माहिती नुसार परिसरात रोडच्या कडेला बंद असलेल्या दरवाज्याचा पिंजरा ही लावण्यात आला होता.वनविभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लावलेला पिंजरा तसेच दिसलेला बिबट्या स्मरणात राहिला नसल्याने आज एका १० वर्षाच्या मुलीला प्राण गमवावा लागल्याने वनविभाग अधिकारी तसेच कर्मचारी या घटनेचे जबाबदार असल्याचे गावकऱ्यांची चर्चा सुरू आहे.या घटनेत मुलीने प्राण गमावल्या नंतरच वनविभाग अधिकारी झोपेतून खडबडून जागे होत घटनेची शहानिशा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी तांबे,सहाय्यक वनरक्षक प्रदीप संकपाल,वनपाल अलका राठोड,वनरक्षक चोरमारे,निकाळजे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरा पर्यंत तपास सुरू असल्याची माहिती रात्री ११ वाजे दरम्यान मिळाली

NTV NEWS MARATHI
प्रतिनिधी अलीम शेख बिडकीन छ संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *