छत्रपती संभाजीनगर :- येथील कन्नड तालुक्यातील आमदाबाद, तसेच करंजखेड, वाकी अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच भावी आमदार व तालुक्याचे प्रभावी उद्योजक मनोज पवार यांच्याकडून सांत्वन भेट ही आज आमदाबाद तसेच करंजखेड येथे देण्यात आली .सामाजिक जाणीव असलेले व तळागाळातील लोकांच्या भावनांना आदर करणारा व्यक्तीमत्व कन्नड तालुक्यातील भूमित विकासपुरुष म्हणून उदयास येत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा भावी आमदार म्हणून मनोज भाऊ पवार यांचे नाव समोर येत आहे त्यांनी काल आमदाबाद येथील दुर्घटनेत मयत झालेल्या गणेश कडुबा सुसर कुटुंबाला सांत्वन भेट व तसेच काही आर्थिक मदत यावेळी त्यांनी केली
तसेच करंज खेड येथील अवघ्या तरुण वयातच गजानन वंकर खरात यांचे हृदयविकाराने मृत्यू झाला. कुटुंबातील करता सदस्य गमावल्याने कुटुंबावरती मोठे संकट ओढून आलेल्या परिस्थितीला कुटुंबाला आर्थिक सहाय्य करून प्रथमतः मदत केल्या मुळे त्यांची चांगलीच प्रशंसा करंज खेड येथे व तसेच पंच कृशित होत आहे.
त्यांनी घेतलेला हा निर्धार नक्कीच जनसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस व माणुसकीची जाण ठेवून काम करण्याचा निर्धार मनोज भाऊ पवार यांनी घेतलेला आहे त्यांच्या या कार्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचे नाव होत आहे . तालुक्यातील प्रथम असा व्यक्ती जो जनसामान्यांन पर्यंत जातोय यामुळे विरोधकांच्या मनात चांगलीच धडकी भरलेली दिसून येत आहे.