ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने बीड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सात तालुक्यातील तब्बल ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच, १३ सरपंचांचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे.या संदर्भातील आदेश २० जानेवारी रोजी काढण्यात आला आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.