लातूर येथील नामांकित कै. प्रकाशराव धुमाळ व काकाज् इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांसाठी खरी कमाईच्या माध्यमातून आनंद नगरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पोलीस निरीक्षक जंगापले सर , विश्वनाथ कोळसुरे सर , अनंत शिंदे, प्रभाकर सूर्यवंशी, बळवंत देशमुख, संजय मोरे, गोपाळ कदमापुरे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ , सचिव काकासाहेब धुमाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
विद्यार्थ्यांना जीवन जगताना खरी कमाईच्या माध्यमातून व्यवहार कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक आज आनंद नगरी च्या माध्यमातून करण्यात आले. यामध्ये घरातील लागणाऱ्या सर्व वस्तू बरोबरच वेगवेगळे खाण्याचे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले होते व त्यांची विक्री करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये पैशाचे अनमोल महत्त्व कसे असते याची जाणीव करुन दिली. सोबतच पालकांनी उत्साहात विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा टाकून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला व यामध्ये वैभवी धुमाळ या विद्यार्थिनी आईस्क्रीम विक्रीतून 3920 रुपये एवढी कमाई करत प्रथम क्रमांक मिळवला त्याबरोबरच 3660 रुपये मिळवत वेदांत कदम या विद्यार्थ्यांने व्दितीय क्रमांक मिळवला.

नाविन्यपूर्ण पदार्थाचा समावेश
स्पर्धेच्या युगात कलागुणांना वाव देताना आज आनंदनगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवनवीन पदार्थ तयार करत जणू सर्वांना आश्चर्यचकित केले व घरच्या घरी भेसळमुक्त पदार्थ कसे तयार करतात याचे प्रत्यक्षात दर्शनच दिले पालकांनीही त्यावर ताव देत बालगोपाळाचे मनोबल उंचावून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.