BHAGYASHRI FAND | यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री फंड हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब प्रदान करण्यात आला. ही लढत ४ विरुद्ध २ अशा गुणांनी भाग्यश्रीने जिंकली. दोन्ही मल्लांनी डावपेचांची उधळण केली. बांगडी, पट, ढाग, कलाजंग आदी डाव वापरले. तिसऱ्या स्थानासाठी वेदिका सारने (कोल्हापूर शहर), तर चतुर्थ स्थान ज्योती यादव (जळगाव) यांनी प्राप्त केले.
#pune #bhagyashreefund #maharashtraKesari #ntvnewsmarathi