उमरगा प्रतिनिधी:शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला .
26 जानेवारी रोजी सकाळी माजी सैनिक संघटनेचे ज़िल्हाअध्यक्ष सुभेदार शहाजी चालुक्त साहेब यांच्यात हस्ते ध्वज वंदन करण्यात आले.
या प्रसंगी महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून सलामी देण्यात आली. या प्रसंगी सुभेदार सूर्यवशी साहेब, दिगंबर कांबळे , तसेच वसतिगृहाचे व्यवस्थापन समिती चेरमन धम्ममित्र चंद्रकांत उर्फ प्रियदर्शी कांबळे, दूरसंचार अधिकारी सूर्यवंशी, वनविभागाच्या अधिकारी प्रमिला ताई सूर्यवंशी धम्ममित्र : मंदा टिळे शांताबाई गायकवाड , रत्नदीप उमाटे , दिगंबर कांबळे हे उपस्थित होते, वसतिगृहाच्या सर्व विधार्थ्यानी NCC परेड केले. विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते फळे, व खाऊ वाटप करण्यात आले व प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्याना भोजन देण्यात आले त्यानंतर विध्यार्त्यांचे माझ्या देशाचे साविंधन या विषयावर वक्तृत्त्व स्पर्धा , देशभक्तीपर गीत इ संस्कृतीक कार्यक्रम पार पडले या निमित्ताने वसतीगृहाचा परिसर तोरणे पताका रांगोळी इत्यादी, स्वछ आणि सुंदर बनविण्यात आला पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रमाणे वसतीगृहामध्ये भारतीय लोकशाहीचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला यासाठी वसतिगृह व्यवस्थापन समिती, अधीक्षक आणि सर्व कर्मचारी सौ पद्मिनी सुरवसे आयुष्यमान कमलाकर सुरवसे, कराटे शिक्षिका प्रतीक्षा राठोड,संतोष मोरे,जाधव सर, व्यवस्थापन समिती सदस्य वगरसेन कांबळे व विधार्थी शान गायकवाड 8 वि , अतुल गायकवाड 8 वी , वाघेश्वर काळे 9 वि , संस्कार पवार 9 वि , शुभम चाबुकस्वार 10 वि , सागर सास्तुरे 8 वि, कार्तिक राठोड आठवी, अनिकेत कांबळे दहावी सागर सासरे आठवी संविधान कांबळे सहावी, वेदांत जोगदंड आठवी आणि सर्व विद्यार्थी इत्यादींनी परिश्रम घेतले, संस्कार पवार नववी याने एनसीसी परेड चे संचालन केले कार्यक्रमांमध्ये दिगंबर कांबळे, नारायण इरले, अकबर इनामदार,आशिष गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, सुभाष बिराजदार,जयवंत पाटील, प्राध्यापक मारुती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी प्रज्ञाजीत सर यांनी केले तर आभार मंदाताई टिळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *