♦️महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४ हजार ७०० थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला आहे. त्या माध्यमातून ४.६० कोटींची वसुली झालेली आहे. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महापालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी केले आहे. महापालिका प्रशासनाने (ता. ८) जानेवारी पासून ३१ जानेवारी पर्यंत मालमत्ता करा वरील शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिलेली आहे. अद्यापही २०६ कोटींची थकबाकी आहे. सुमारे ७५ हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.