पुसद शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृतीचे ईसमावर आळा बसावा या करीता प्रभारी ठाणेदार धिरज बांडे यांनी प्रभावी गस्त (पेट्रोलींग) वाढवुन कारवाई करन्याचे आदेश पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकास सुचना दिल्या त्याच सुचणे प्रमाणे पुसद शहर डी.बी. पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना डी. बी. पथकास गोपनिय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर मिळाली की, एक ईसम हातात धारदार शस्त्र घेउन दंहशंत निर्माण करीत असुन घातपात करन्याचे उदेशाने संशईतरीत्या पुसद शहरातील अमराई सुभाषवार्ड पुरप्रतीबंधक बांधाजवळ पुसद येथे फिरत आहे. असे माहीती वरुण घटनेचे गांभीर्य ओळखुन डी. बी. प्रमुख सपोनि निलेश देशमुख व डी.बी.स्टॉप. पथक यांनी अतिशय कौशल्यपुर्वक सापळा रचुन आरोपी मोहम्मद फैज मोहम्मद ईक्बाल वय 19 वर्षे रा. अमराई सुभाषवार्ड पुसद यास ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ एका पांढ-या कापडामध्ये गुंडाळुन एक धारदार व टोक असलेली तलवार किंमत 800/रुपयेची मिळुन आली. त्यास शस्त्रासह अटक करुण त्याचेवर पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करुण पुढील तपास स.पो.नि.निलेश देशमुख डी.बी.स्टॉप करीत आहेत.

सदरची कारवाई – पोलीस अधिक्षक, श्री, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार धिरज बांडे यांचे सुचनाप्रमाणे डी.बी. प्रमुख सपोनि निलेश देशमुख, पो.हवा. प्रफुल ईगोले, पो.हवा. मनोज कदम, पो.काँ. शुध्दोधन भगत, पो.काँ. आकाश बाभुळकर यांनी पार पाडली आहे.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *