सर्वांचे आदरणीय शंकर मामा साबळे यांच्या निधनाने सर्व सामान्याची माया हरपली तर त्यांच्या मृत्युने नान्नज परिसरात शोककळा
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रहिवाशी तथा अहिल्या नगर जिल्हयाचे माजी जि प अध्यक्ष स्वर्गीय बाबा साहेब निवृत्ती पवार (पाटील) यांचे विश्वासु सेवक म्हणून ओळख असणारे नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सेवा सोसायटीचे सलग 25 वर्षे धान्य वाटप सेवक म्हणून अल्पषा वेतना मध्ये कामकरून सर्व सामान्य गोर गरीबाची सेवा करत सतत एकनिष्ठ राहुन समाज स्थरातील सर्व जाती धर्मातील लोकांशी आपली व आपल्या कुंटुंबाची नाळ जुळवलेले सर्व परिचित असे व्यक्तीमत्व स्वर्गीय शंकर बाबुराव साबळे वय 89 यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या रहात्या घरी दि 27 जानेवारी पहाटे 2 वाजता दुखद निधन झाले त्यांच्या वर नान्नज येथील गुरेवाडी रोड वरील स्मशान भुमीत सर्व आप्त इष्ट मित्र परिवार कुंटुंबियांच्या उपस्थित शोकाकुल वातावरणात अत्य संस्कार करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर त्यांचे मागे पत्नी सोजर बाई मुलगा विजय साबळे सुन माया साबळे नातु वैभव साबळे सार्थक साबळे नातसुन सानीका साबळे छोटा पंतु असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने सर्वावर दुखांचा डोंगर कोसळला आहे समाज मनातील मायेचा माणुस हरपला असलेची प्रतिक्रीया जनसामान्य करत आहेत
त्यांचा दशक्रिया वीधा नान्नज ता जामखेड येथील गुरेवाडी रोड स्मशान भुमी जवळील नदी पात्रात दि 5 / 2 / 25 रोजी सकाळी ठिक 10 वाजता होणार आहे
शोकाकुल
समस्त साबळे परिवार नातेवाईक
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर