♦️शिर्डी परिसरात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात दहा संशयित आरोपींविरुद्ध पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी परिसरात अवैध धंदे सुरु असल्याचे कळाले. त्यानुसार पथकाने विविध ठिकाणी छापा टाकला. यात दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.