औसा: तुर हमीभावाने शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे यामुळे औसा येथे खरेदी विक्री संघात तुर ऑनलाईन नोंदणी करावी असे अहवान खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी केली आहे.
केंद्राने तुरी साठी 7550 हमीभाव जाहीर केला आहे आणि 22 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे
तुर हमीभान नोंदणीसाठी अद्ययावत सातबारा, 2024-25 चा ऑनलाईन पीकपेरा, आधार कार्ड सत्यप्रत्य, बँक पासबुकच्या आयएफएससीसह सत्यप्रत घेऊन खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात करावी.
तसेच शेतकऱ्याना मोबाईलवरून देखील नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे सेतू केंद्र व खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी मोबाईलवजवळ असणे आवश्यक आहे नोंदणी करताना त्यावर ओटीपी जाणार असून तो नोंद केल्याशिवाय नोंदणी होणार नाही असे आवाहन औसा तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवशी, उपसभापती शेखर चव्हाण यानी केले आहे.
