एन टीव्ही न्यूज अहेरी तालुका प्रतिनिधी:-शंकर मुत्येलवार

अहेरी:- अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई टाळण्यासाठी तब्बल 83 हजार रुपयाची लाच घेताना एफडीसीएमच्या एका अधिकाऱ्याला गडचिरोलीच्या अँटी करप्शन ब्युरोने 83000 ची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई प्रणीहिता वनपरिक्षेत्र कार्यालयात 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास झाली मारुती गायकवाड असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ती व्यक्ती वनपाल या पदावर कार्यरत होते.


अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविकास महामंडळ प्रकल्प आलापल्लीत आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आपापली उपक्षेत्रातील तानबोडी बिटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होते 6 फेब्रुवारी रोजी एफडीसीएमच्या आलापल्ली कार्यालयातील वनपाल मारुती गायकवाड आणि वनमजुरानी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडीसाठी कार्यालयात बोलावले मारुती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल एक लाख दहा हजाराची मागणी केली तडजोडी अंती एक लाख देण्याचे ठरविले. 17000 दंड ठोठावून त्यांनी 83 हजार परस्पर स्वीकारले मात्र फिर्यादीला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी च्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती. एसीबी च्या पथकाने 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारुती गायकवाड लाच स्वीकारताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात रंगीहात पकडून ताब्यात घेतले.
ही कारवाई गडचिरोली करप्शन ब्युरोचे डीवायएसी चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,एएस आय सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जजाडकर, हवालदार शंकर डांगे ,पोलीस अंमलदार संदीप ,उडान संदीप घोडमारे यांनी केली असून अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीच्या पथकाने संबंधित आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घराची जडती घेतली यात आणखी कोणी अधिकारी कर्मचारी समाविष्ट आहेत की काय त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे एफ डी सी एम च्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *