प्रतिनिधी (आयुब शेख )
धाराशिव जिल्ह्यामध्ये दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणाऱ्या शिवजंयतीच्या अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिने मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे अध्यक्षतेखाली आज दि. 11 फुब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे धाराशिव शहरातील प्रमुख जयंती उत्सव मंडळ मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव व शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक पारपडली.

सदर बैठकीस श्री गौहर हसन, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव, पोलीस निरीक्षक मांजरेपाटील, पोलीस निरीक्षक शकील शेख व पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर अधिकारी हजर होते. सदर बैठकीत जंयती मंडाळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे कडून उत्सव अनुषांगाने आयोजित कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या समस्यां बाबत चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशानाकडून जिल्ह्यातील जयंती उत्सव मंडळ व नागरीकांना आवाहन
श्री. संजय जाधव, पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी सध्या इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांची परीक्षा चालु असुन आयोजित कार्यक्रमांमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही याची जाणीव ठेवून कार्यक्रम साजरे करावते. तसेच ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जयंती उत्सव दरम्यान अचानक एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्या बाबत परसृपर कार्यवाही न करता त्याची प्रथम प्रशासनास माहिती द्यावी. पोलीस नियमानुसार योग्य ती आवश्यक कार्यवाही करतील.
मोटरसायकल रॅली / अॅटो रॅली यामध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुका ह्या DJ/ डॉल्बी विरहीत, पारंपारीक वाद्याचा वापर करुन दिलेल्या
मार्गानेच व नेमुण दिलेल्या वेळेच्या आत शांततेत पुर्ण करव्यात.
मा. पोलीस अधीक्षक यांनी अपेक्षा व्यक्त केली की दरवर्षी प्रमाणे जयंती उत्सव विधायक कार्यक्रम करुन साजरा करण्यात येईल. उत्सव समिती, नागरीक व पोलीस यांचे समन्वयाने शिवजयंती उत्सव जिल्हाभरात उत्साहात व शांततेत पारपडेल अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केली.