छत्रपती संभाजीनगर.

फिर्यादी नामे सोमनाथ दादासाहेब साळुंके वय ३४ वर्ष व्यवसाय शेती रा.तितरखेडा ता.वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दि ०७/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणे शिवुर येथे जाउन फिर्याद दिली की, दि ०७/०२/२०२५ रोजी ११.०० ते १.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दरवाज्याचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातुन सोने चांदी व रोख रक्कम असा एकुण ३१२०० / रुपयाचा ऐवज चोरुन नेला वगैरे मचकुराचे फिर्याद वरुन पोलीस ठाणे शिवुर येथे गुरन ३७/२०२५ कलम ३३१ (३) ३०५ (अ) बी. एन एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांना गोपनिय बातीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा अजव्या महादु भोसले व त्याचा साथीदार आकाश उर्फ ताकसाहेब छगन काळे दोन्ही रा. अंतापुर गायरान ता.गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून केला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थागुशा पथकासह सदर आरोपीचा गंगापुर येथे जाउन शोध घेत असतांना सदरचे आरोपी हे दि ८/०२/२०२५ रोजी गंगापुर ते अंतापुर गायरान जाणारे रोडने मोटार सायकलने जात असतांना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेउन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव १) अजब्या महादु भोसले वय २७ वर्ष रा अंतापुर गायरान ता.गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर २) आकाश उर्फ ताकसाहेब छगन काळे वय २५ वर्ष रा. अंतापुर गायरान ता.गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे सागीतले. त्यांना सदर गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस करता त्यांनी सुरवातील उडवाउडवीचे उत्तरे दिली. पुन्हा त्यांना विश्वासात घेउन विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देउन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल रोख रक्कम व सोन्याचे दागीने आणी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व इतर साहीत्य असे मुद्देमाल मिळुन आले.तसेच वरील गुन्हयाचा तपास करीत असतांना अभिष छगन काळे हा अंतापुर गायरान ते गंगापुर जाणारे रोडवर मोटार सायकलवर जात असतांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेउन त्यास त्याने नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अभिष छगन काळे वय २५ वर्ष रा. अंतापुर गायरान ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले त्यास गुन्हया संदर्भाने विचारपुस करता त्याने सांगीतले की, काही दिवसापूर्वी शिवराई ता वैजापुर येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलीस ठाणे वैजापुर येथील अभिलेखावरुन माहीती घेतली असता पोलीस ठाणे वैजापुर गुरन ७२९/२०२४ कलम ३३१(१), ३०५ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेल्या रोख रक्कमे पैकी काही रक्कम व गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल व इतर साहित्य मिळुन आले. वरील आरोपीतांना पुन्हा विश्वासात घेउन विचारपुस करता त्यांनी व त्यांचे साथीदारांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हयात पोस्टे वैजापुर, गंगापुर, शिवुर, शिल्लेगाव व विरगाव इत्यादी पो स्टे हाद्दीत एकुन १० घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सपोनि सुधीर मोटे, सफौ लहु थोटे, पोहेकों नामदेव शिरसाठ, श्रीमंत भालेराव, संतोष पाटील, विठ्ठल डोके, नरेंद्र खंदारे. वाल्मीक निकम, सुरेश सोनवने, शिवानंद बनगे, प्रशांत नांदवे पोना, विजय धुमाळ, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप, मपोअं पदमा देवरे, चालक निलेश कुडे, शिवाजी मगर, संतोष डमाळे यांनी केली आहे.

N TV न्युज मराठी प्रतिनिधी जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *