येरमाळा प्रतिनीधी ( सुधीर लोमटे ) –

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे शिवजयंती निमित्त येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने दिनांक १५ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्ञानोद्योग विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेमध्ये भरघोस बक्षिसे ठेवलेली आहेत . त्यामध्ये प्रथम पारितोषिक कळंब पं . स. चे माजी सभापती विकास बारकुल यांच्या वतीने २१ हजार रूपये रोख व ट्रॉफी, व्दितीय क्रमांकासाठी लहुजी शक्ती सेनेचे सागर कसबे यांच्या वतीने १५ हजार रुपये व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास कैलास बारकुल यांच्या वतीने ७ हजार रुपये व ट्रॉफी तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस प्रशांत बेदरे यांच्याकडून ५ हजार रुपये व ट्रॉफी अशा स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत . त्याचबरोबर वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट रेडर साठी बाळासाहेब बारकुल यांच्याकडून ५ हजार, बेस्ट डिफेंटर साठी अनिल पवार यांच्या कडून ५ हजार, बेस्ट ऑल राउंडर खेळाडू साठी निळकंठ बारकुल यांनी ५ हजार तर शिस्तबंध संघासाठी समाधान बेदरे यांच्या वतीने ५ हजार रुपायांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . सर्व विजेत्या संघाला जनहित पतसंस्थेच्या संतोष तौर यांच्या सौजन्याने ट्रॉफी देण्यात येणार आहेत .
या पुरुषांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता विकास बारकुल ,डॉ. संदीप तांबारे व सागर कसबे यांच्या हस्ते होणार आहे .
सामने दिवस रात्र खेळवले जाणार आहेत. संघ नोंदणी अंतिम दिनांक १४ फेब्रुवारी असुन प्रवेश फी ५०१ रु. असेल तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे संतोष जमदाडे, प्रणव बारकुल, आकाश बारकुल,अनिकेत पवार, सोहेल पठाण आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *