जामखेड शहरात रस्ता अपघातात दोन वर्षात पाच जणांचा मृत्यु अनेक जनांना अपंगत्व
ठेकेदाराचा हलगर्जीपणा तर बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
त्वरीत निर्णय घ्या अन्यथा रोडवर ठाण मांडून बसणार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा अखेरचा इशारा
जामखेड शहरातुन जात असणाऱ्या कोठारी पेट्रोल पंप ने सौताडा घाट या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून चालु असून सदर काम करणारे ठेकेदार हे काम अगदी मंद गतीने करत आहेत तसेच कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम खडी मुरूम याचे ढेर रस्त्या वर अडथळा निर्माण करतील असे टाकले आहेत कुठेही रस्त्यावर सुचना फलक दिशा दर्शक अथवा सांकेतिक अशा मार्गदर्शक चिन्हा चा फलक अथवा सुचना नाहीत त्यामुळे या रस्तावर दोन वर्षात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर पन्नास च्या वर लोकांना अपंगत्व पत्करावे लागले आहे हे सत्र कुठवर चालु रहाणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उपस्थित केला असून आता वेळो वेळी सांगुन अर्ज विनंती करून सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्षच करत असेल तर आता रस्त्यावर ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध केला आहे या पुर्वी अनेक वेळा
उप अभियंता अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभाग घटमळ महामार्गाचे प्रकल्प संचालक नरेंद्र गांगुली , प्रकल्प व्यवस्थापक सचिन पवार यांना सदर माहिती बऱ्याच वेळा दिलेली आहे परंतु ते लक्ष दिले गेले नाही आता तरी लक्ष देऊन सौताडा घाट ते कोठारी पेट्रोल पंप पर्यंत रोडचे काम त्वरित करावे अन्यथा आम्हाला रोडवर येऊन आंदोलन करावे लागेल अशा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीने देण्यात आला आहे
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124