आई वडिलांची सेवा करणे हेच आपले परमधर्म असावे असे आव्हान अभिषेकसिंह यानि युवकाना दिले

सावनेर तालुक्यातील सावळी(मो) यागावामधे १९ फेब्रुवारी ला शिवगर्जना मित्र परिवारा तरफे भव्य शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यामधे १८ फेब्रुवारी ला रक्तदान शिबीरचे आयोजन साईनाथ ब्लङ बँक तर्फे करण्यात आले त्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा व महीलांकरिता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली….१९ फेब्रुवारीला भव्य मिरवणूक व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामधे प्रमुख उपस्थितीत केळवद पोलीस स्टेशन ठाणेदार श्री अनिलजी राउत , पोलिस उपनिरक्षक विलास गेडाम , सामाजिक कार्यकर्ते भूषण दादा कुबडे, व्याख्याते कामेश अलघरे, प्लॅनेट आय टी संचालक मा. श्री अभिषेकसिंह गहरवार यांचे व्याख्यानाने आणि बक्षिस वितरण समारंभ पार पडला.
“सर्व युवा वर्गाने छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आदर्श समोर ठेवावे आणि आपल्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीलाच आपले परम धर्म समजून जीवनात परिश्रम करावे असे प्रतिपादन अभिषेकसिंह गहरवार यांनी आपल्या व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे आयोजन व संचालन शिवभक्त हरिष मोहतकर,रवींद्र काकङे,लुकेश मोहतकर,तुषार मोहतकर,निलेश मरसकोल्हे, राहुल झाङे, आशिष बेलेकर, कू. काजल मोहतकर यांच्या विषेश प्रयत्नाने आयोजन करण्यात आले, आभार प्रदर्शन प्रशांत जीवतोडे यांनी केले.
प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *