सावनेर तालुक्यात वलनी ग्रा पंचायत मदील सदस्य
नागपुर जिल्ह्यातिल सावनेर तालुक्यात वलनी ग्रामपंचायतचे अपक्ष सरपंच श्री.अरविंद गजभिये यांनी नुकताच केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे आणि सावनेरचे
आमदार डॉ. आशीष देशमुख
यांच्या उपस्थितीतत भाजपमध्ये
प्रवेश केला. दरम्यान 10
जानेवारी 2025 रोजी वलनी
ग्रा. पं. च्या 4 भाजप सदस्यांनी
पक्षश्रेष्टींना न कळवता काँग्रेस
समर्थित सदस्यांसोबत हात मिळवणी करून भाजप समर्थित सरपंच श्री.अरविंद गजभियेयांच्या विरोधात सावनेरचे तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला तसेच 16 जानेवारीला अविश्वास
प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने या
चारही सदस्यांना भाजपच्या
प्राथमिक सदस्य पदावरून तसेच
पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित
केले आहे. यामध्ये ग्रामपंचायत
सदस्य कन्याकुमारी बोन्द्रे वॉर्ड क्र
1, राजकुमार ठाकरे वॉर्ड क्र 1,
बेबीताई बावने वॉर्ड क्र 2 व
सिंधूताई चकोले वॉर्ड क्र 2, यांचा
समावेश आहे.भारतीय जनता पार्टी
सावनेर तालुका अध्यक्ष मंदार
मंगळे यांनी या संदर्भातील
निलंबन पत्र काढले असून
सुधाकर कोहळे अध्यक्ष भाजपा
नागपूर जिल्हा ग्रामीण, सावनेरचे
आमदार डॉ. आशीष देशमुख,
राजीव पोतदार सावनेर विधानसभा प्रमुख भाजपा याना कळविले आहे. सावनेर तालुक्यात आजपर्यंत भाजपकडून करण्यात आलेली ही पहिली सर्वात मोठी कारवाई आहे. एकंदरीत मागील काही दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असलेली वलनी ग्रामपंचायत भाजपच्या चार सदस्यांवर 6 वर्षांसाठी करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईने पुन्हा चर्चेत आल्याचे चित्र सध्य सावनेर तालुक्यात आहे. या कारवाई मुळे वलनी ग्रामपंचायतचे सरपंच श्री.अरविंद गजभिये यांनी पुन्हा आपल्या राजकीय शक्तीचा परिचय
जिल्ह्याच्या राजकारणात दिल्याची चर्चा अनेक ठिकानि जागो जागी सुरू आहे.