भोकरदन तालुक्यातील कोदा येथील २३ वर्षीय ऋषिकेश उत्तम घनघाव तरुणांकडून पारध पोलीस स्टेशनने धारदार तलवार जप्त करण्याची कारवाई केली असून या प्रकरणी सदरील तरुणावर सि.आर, नंबर ४४/ २०२५ कलम ४,२५ शस्त्र अधिनियम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला असून सदर कारवाई अजय कुमार बन्सल,पोलिस अधिक्षक जालना,आयुष नोपाणी अपर पोलिस अधिक्षक जालना, डॉ.गणपत दराडे उपविभागीय पोलिस अधिकारी भोकरदन, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक पंकज जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि एस डी माने,पोउपनि व्ही. एस नेमाणे पोह. प्रकाश सिनकर,पोह. काकड पोलिस अंमलदार संतोष जाधव, पोलिस अंमलदार जंगले होमगार्ड साजेद शेख यांनी केली आहे.

प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना