तालुका पोलीस ठाण्यात तक्रार, पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ !

JALNA | पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे पत्रकार उभ्या असताना त्यांच्या समोर धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनाच पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले असून याबाबत वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून याबाबत पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्‍वासन ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
या संदर्भात दिलेल्या तक्रारीत जलजला टाईमचे संपादक आमेर खान याकुब खान याने म्हटले आहे की, त्यांच्या वृत्तपत्रात दि 31 मार्च 2025 रोजी बातमी लावल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी यांनी जालना तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते त्यांना समोर बुधवार (दि 2) रोजी धमकी देत चेतावले आहे. श्री माळी म्हणाले की, खेटायचे असेल तर मी पूर्णपणे आता खेटतोच व तुला बघुन घेतो असे म्हणून त्यांनी आमेर खान याचे फोटो काढले. चंद्रकांंत माळी यांचे वाळुमाफीयांशी हितसंबंध आहे. त्यामुळे श्री माळी यांच्याकडून व त्यांच्या हितचिंतकांकडून आमेर खान यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद असून पोलीस अधिकार्‍यांनी वेळीच या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांना पत्रकारांचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चंद्रकांत माळी यांना बोलावून घेऊन नेमके प्रकरण काय ते त्यांच्याकडून जाणून घेतले. पत्रकारांच्या शिष्टमंडळासमोर श्री माळी यांनी घटनाक्रम सांगत एक प्रकारे धमकी दिल्याची कबुलीच दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले. तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेदरम्यान पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना पत्रकार संरक्षण कायद्याची माहितीच नसल्याने त्यांनी पोलीस निरीक्षकांना याबाबत विचारले असता त्यांना देखील याबाबत विचारले असता ते देखील अनिभिज्ञ असल्याने त्यांनी तक्रार द्या, वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून कोणता गुन्हा दाखल करायचा याबाबत जाणून घेऊन येत्या दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.
पोलीसांनी आश्‍वासन दिले असले तरी या बाबीचे गांभीर्य पोलीसांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा पत्रकारांच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाचा ईशाराही पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

काही पत्रकारांची भुमिकेमुळे पत्रकारांत नाराजी
तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस कर्मचार्‍यांकडून पत्रकारांस दिलेल्या धमकीनंतर पोलीस कर्मचार्‍यांची बाजु घेत जलजला टाईमचे संपादक आमेर खान यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याबाबत दबाव टाकण्याचा प्रयत्न काही लांगुनचालन करणार्‍या पत्रकारांकडून झाला. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात दुपारी सव्वा तीन वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत आमेर खान यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेल्या पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा पत्रकारांनी पत्रकारांची बाजु घेणे गरजेचे असतांना त्यांनी नेमके कोणत्या संबंधातून पोलीस कर्मचार्‍यांची बाजु घेण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रूत आहेच.

प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *