भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भरधाव हायवाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने १५ महिला जखमी झाल्या. त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास रेलगाव पाटीजवळ भडगाव येथे घडला. या भीषण अपघातात बोलेरो पिकअपचा चेदामेंदा झाला अधिक माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर अवैध वाळूचा हायवा भरधाव वेगाने जात होता. तर पिंपळगाव रेणुकाई येथे
लग्नसमारंभाचा स्वयंपाक करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातून आलेल्या महिला स्वयंपाक संपवून बो-लेरो पिकअपमधून सिल्लोडकडे परत जात होत्या. भडगावकडे येणाऱ्या हायवाने पिकअपला जोराची धडक दिली. यात पिकअपमधील १५ महिला जखमी झाल्या असून, त्यातील तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

वाळू घेऊन जाणाऱ्या हायवाचा क्रमांक (एमएच-४०-बीआर-६०५७) असून, पिकअपचा क्रमांक (एमएच-०४-जीआर-३६१७) आहे. जखमी महिलांना प्रथम उपचारासाठी भोकरदन भीषण अपघातात बोलेरो पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला ग्रामीण रुग्णालय व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले आहे. हा अपघात गावकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना