प्रतिनीधि मंगेश उराडे ntv न्यूज़ मराठी नागपुर
विधानपरिषदेचे ५ सदस्य
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तेव्हा विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या
जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्यानुसार २७ मार्चला मतदान होणार
आहे. यावेळी भाजपच्या कोट्यात असलेल्या आमदार प्रवीण दटके यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार? याची उत्सूकता वाढली आहे. दरम्यान सावनेर कळमेश्वर
विधानसभा मतदारसंघातपरिवर्तन घडवून आणणाऱ्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास महल्ले यांच्यासह नागपूर
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे.नागपूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या दोन आमदारांच्या जागा रिक्त आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेतरप्रवीण दटके आमदार कोट्यातून निवडून आले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दोन विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत.नागपूर जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद अस्तित्वात नाही, त्यामुळे निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेची जागा रिक्त राहणार आहे राज्यात विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम ३ मार्चला जाहिर झाला आहे. त्यात नागपूर (मध्य) विधानसभा मतदार संघातून निवडून गेलेले आमदार प्रवीण दटके यांच्या जागेवर निवडणूक होत आहे. नागपूर
ग्रामीणमधून भाजपाच्या कोट्यातून राज्यपरिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अॅड. प्रकाश टेकाडे
यांची नावे विधानपरिषदेच्या उमेदवारी साठी चर्चेत आहेत. डॉ. राजीव पोतदार यांची राजकीय कारकीर्द बघता त्यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना २०१९ साली तिकीट दिली होती, मात्र ते पराभूत झाले. मधल्या काळात त्यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचे जाहिर केले, मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे पक्ष श्रेष्ठीना कळविले. डॉ राजीव पोतदार यांनी नेहमी पक्षासाठी त्याग केला आहे.
पक्षाने दिलेल्या आदेशाचेत्यांनी नेहमी प्रामाणिकपणे पालन केले. नागपूर ग्रामीण भाजपमध्ये डॉ. राजीव पोतदार यांची ओळख सर्वमान्य नेता म्हणून आहे. पक्षासाठी त्याग व
बलिदान त्यांनी दिले आहे त्यामुळे कार्यकर्ता वर्गातून डॉ. राजीव पोतदार यांना विधानपरिषद उमेदवारी देण्याची
मागणी केल्या जात आहे. तेव्हा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानपरिषद उमेदवारी बाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *