8 मार्च हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय.हल्ली प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, समर्पणाची भावना ठेवत स्वतःला त्यात झोकून देणाऱ्या आणि कितीतरी क्षेत्रात पुरुषांपेक्षाही सरस काम करणाऱ्या या महिलांसाठी आदर म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सूचनेनुसार आज टिळक पत्रकार भवन धंतोली, नागपूर येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे नागपूर शहर अध्यक्ष, अनिल बालपांडे यांनी ह्यूमन राईट असोसिएशन महाराष्ट्र महिला सेलच्या प्रमुख तसेच पत्रकार सुषमा डबराल याचप्रमाणे नवक्रांती या पुस्तकाच्या लेखिका व पत्रकार, नीता सोनवणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
