अवंती फार्म येथे (मड बाथ) मध्ये 55 योग साधकाच्या सहभाग
नागपुर जिल्ह्यात योग मित्र मंडळ व माँ वैष्णवी योग वर्ग रामटेक यांच्या सयुक्त विदमानाने रामटेक खींडसी जवळील अवंती फार्म येथे मड बॉथ (चिखल स्नान) चा कार्यक्रम दिनiक 9 मार्चला आयोजीत करन्यात आला यात 55 साधकांनी भाग घेतला… योगाचार्य मधूकर पराते यांनी मड बाथचे फायदे सांगीतले ते म्हणाले वर्षातून मार्च महिन्यात मड बाथ करावे… मातीमध्ये अनेक औषधीय गुणधर्म आहेत… मातीमध्ये चंदन पावडर, नागरमोथा, गुलाबजल, अलोवरा, गुलाब फुल सहित आदि मिसळवले की औषधीय माती तयार होते… या मातीच्या लेप शरिरावर लावल्यास त्वचेचे छीद्र मोकळे होते… शरिरावरील सर्व तैलिय पदार्थ निघून जातात, त्वचेला चकाकी येते…

विशेष म्हणजे मड बॉथ करीता 10 चौरस फुट व 5 फुट खोल गड्डा खोदण्यात आला… त्यात तलावातील चीकणमाती टाकण्यात आली… मातीच्या गाळ करुन त्यात इतर औषधीय पदार्थ टाकण्यात आले… सर्व शरीराला मातीच्या लेप लावण्यात आला.. एक तास उन्हात शेकल्यावर अंघोळ करण्यात आली…
डॉ. बापू शेलोकर यांनी मातीचे उपयोग सांगीतले व म्हणाले की विविध रोगावर योग्य पद्धतीने मातीचा लेप दिल्यास हमखास फायदा होतो… त्यांनी आरोग्यविषयक आहार, हार्ट अटक आल्यास प्रथमोपचार सांगीतला… तलावात डुबल्यास बाहेर काढल्यावर फुप्फुस मधील पाणी कसे काढावे या विषय विषयी मार्गदर्शन केले… कार्यक्रम यशस्वीते करीत योगाचार्य मधुकर पराते, मितराम सव्वालाखे, गजानन गुंडुकवार, सुरेश टिपले, नत्थू घरजाळे , राहुल सोमकुंवर आदिनी प्रयत्न केले…
विशेष प्रतिनीधि( मंगेश उराडे NTV न्यूज़ मराठी नागपुर जिल्हा)