सावनेर येथे आयोजित भाजपच्या बूथ पक्षनिहाय आढावा सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे
पक्षाचे (एस.पी) जिल्हा महासचिव युवराजजी मेश्राम यांचा भाजप पक्षात प्रवेश घेतलेला आहे. युवराज मेश्राम यांना डॉ. राजीव पोद्दार यांच्या हस्ते भाजप पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश देण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोद्दार, जिल्हा महामंत्री ईमेश्वरजी यावलकर, रामरावजी मोवाडे,कळमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी उपाध्ये, जिल्ह्याचे जेष्ठ नेते दिलीपजी धोटे, तालुका महामंत्री व
लिंगाचे उपसरपंच प्रमोद हत्ती आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिनीधी मंगेश उराडे ntv न्यूज़ मराठी नागपुर