गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे .
गंगापूर येथील जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते आज रविवारी (दि.९) दुपारी एक वाजता होईल. न्या. मंगेश शिवाजीराव पाटील, संजय देशमुख, संभाजीनगरचे प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्रभाकरराव इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटन समारंभास आज दुपारी एक वाजता सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष ड. किशोर आर. कऱ्हाळे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश गंगापूर सुभाष के. कऱ्हाळे यांनी केले आहे.