♦️जिल्हा न्यायालय द्विशताब्दी पूर्ती व्याख्यानमाला इतीहासिक स्मरणाना उजाळा
नगर – जिल्हा न्यायव्यवस्थेचा 203 वर्षा च्या पूर्ती महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला, विविध मान्यवरांचा सन्मान, ऐतिहासिक उज्वल परंपरेचा वारसा जतन करीत, विविध स्मृतींना उजाळा देत संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालय न्या. उर्मिला फलके – जोशी, संतोष चपळगावकर, रोहित जोशी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे आदी मान्यवरांचे उपस्थितीत अ नगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशन द्विशताब्दी महोत्सवाचे शानदार आयोजन केले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभयजी ओक यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्व अधोरेखित करताना विविध विकास प्रकल्प राबवितांना पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता राहिली नाही तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचे वेळ आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे शिक्षण शालेय जीवनातून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सेंट्रल बार असोसिएशनचे राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे पार्श्वभूमीवर व्याख्यान मिळाल्याचे आयोजन कौतुक करताना कुठल्याही संस्थाने राज्यघटनेवरील चर्चेच्या विचारमंथनाचे कार्यक्रम आयोजित केल्यास न्यायाधीश म्हणून तेथे जाण्याचे आमचे कर्तव्य आहे, ती आम्ही पार पाडले, या सोहळ्याचे अशा शब्दात त्यांनी या कार्यक्रमाचा न जाण्याच्या पाठपुरावाचा खरपूस समाचार घेतला. तेथे झालेल्या अधिकृत अनाधिकृत असे प्रश्न उद्भवत नाही वकिलांना बंधुत्वाचा विसर पडता कामा नये.

राज्यघटनेच्या कलम 21 चे तत्वज्ञानानुसार माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे मात्र तो समृद्ध निरोगी आनंदी समाधानी वृत्तीने मौल्यवान अधिकारानुसार जगला पाहिजे. त्यासाठी विविध कायद्यांचे काटेकोर पालन, संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून पालन करण्याचे त्यांनी अहवाल केले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी संविधानाने मानवी मूल्यांना वाचा दिली संविधान प्रस्तावना सर्वांनी वाचली पाहिजे. तोच खरा आत्मा असून संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. घटनेने समाजातील प्रत्येक घटकाचा अभ्यास केला असून त्याचे नेहमी ज्ञानदान प्रक्रियेत परावर्तित होत असल्याचे प्रेरणादायी विचार मांडले.

जिल्हा न्यायदान प्रक्रियेच्या 202 वर्षाचा सूक्ष्म मागवा घेणारे विविध व्यक्तीचित्रे, सचित्र असलेली ‘ न्याय मंदिर’ या श्री अशोक कुरापट्टी यांनी संपादित केलेल्या स्मृती ग्रंथाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. श्री कुरापट्टी यांचा न्या. ओक यांनी विशेष सन्मान केला. निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, न्या.रोहित जोशी, संतोष चपळगावकर, उर्मिला फलके – जोशी, प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजूजी शेंडे, शालिनी जोशी – फणसाळकर आदींची सयोचित भाषणे झाली. नगर जिल्ह्याचे सुपुत्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेले बी.जी कोळसे पा., शालिनी जोशी – फणस साळकर, साधना जाधव, एस. एम.गव्हाणे, विनय जोशी, लजी शेवलीकर, बार कौन्सिल सदस्य आरबी पोलाटे, दीपलक्ष्मी म्हसे, विश्वासराव आठरे पाटील, अशोक पाटील, चांगदेव दुबे पाटील, उदय वारुंजीकर व जिल्हा न्यायालय प्रक्रियेत कार्य न्यायाधीश व कार्यक्रमास मोलाचे सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अशोक कोठारी यांनी नगर जिल्ह्याच्या ऐतिहासिक थोर उज्वल परंपरेचा मागावा घेऊन न्यायदान प्रक्रियेतील महानीय योगदानाचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख करून व्याख्यानमालेच्या आयोजनातून मिळणाऱ्या समृद्ध ज्ञानाचा अनुभवाचा नव्या पिढीस प्रेरणा मिळून ‘ न्याय सर्वांसाठी’ या तत्त्वानुसार न्यायदान प्रक्रियेला गती मिळेल,असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा सहकारी वकील ॲड. एस. के. पाटील यांनी आभार मानले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ अमृता बेडेकर हिच्या पसायदान या शानदार सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास जिल्ह्यातून परळ जिल्ह्यातून न्यायदान प्रक्रियेतील न्यायाधीश विधीज्ञ विविध क्षेत्रातील मान्यवर कायद्याचे अभ्यासक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद वकील मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.