♦️जिल्हा रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन शंकर बडे, सागर भानुदास केकाण असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते.


♦️याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉ. साहेबराव डावरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे दोघे पसार झाले होते. या घटनेचा तपास करत असता तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार बडे व केकाण हे पाथर्डी तालुक्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.