लातूर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील रा.प.लातूर विभागातील लातूर बस स्थानक क्रमांक दोन आंबेजोगाई रोड येथील आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेस करिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 8 कोटी 38 लाख 27 हजार पाचशे आठ रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे भेट घेत लातूरच्या राज्य परिवहन विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली होती त्यापैकी प्रामुख्याने बसेसची मागणी व चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ची मान्यता या दोन विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली होती त्यामध्ये लातूरसाठी 10 बसेस प्राथमिक स्वरूपात मंत्री महोदयांनी मंजूर केल्या त्याचप्रमाणे नागरिकांना अद्ययावत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासोबतच इलेक्ट्रिक बसेस ची मागणी व त्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागातील बस स्टँड क्र.२ येथील आवारात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ची उभारणी करण्याबाबतचा प्रलंबीत प्रस्तावा बाबत मा.मंत्री महोदयांशी चर्चा करताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या ई-बसेस साठी विद्युत चार्जिंग स्टेशन च्या उभारणी साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा.मंत्री महोदयांकडे मांडली होती.
याच मागणीप्रमाणे नुकतेच राज्य सरकारने या ठिकाणी 8 कोटी 38 लाख 27 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे यामुळे लातूर येथे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या मार्ग मोकळा झाला असून आगामी दोन महिन्यांमध्ये कामास सुरुवात होणार आहे.


यावेळी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी बोलताना सांगितले कि, प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास मिळावा त्याचबरोबर प्रदूषणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे एसटीच्या लातूर विभागालाही 109 इलेक्ट्रिकल बस मंजूर झाल्या आहेत या अनुषंगाने आवश्यक चार्जिंग स्टेशन संदर्भात मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत तसेच मंत्री महोदयांनी ही मागणी लक्षात घेत या विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणी साठी निधी मंजूर करून दिला त्यामुळे उर्वरीत बसेस या इलेक्ट्रिक प्रणालीच्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व महायुती सरकारचे आभार मानले.

प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी, लातूर
9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *