दिनांक १५/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन बाभूळगांव येथे फिर्यादी नामे सैयद मनसब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने जाबानी रिपोर्ट दिला की, दिनांक १४/०४/२०२५ रोजी त्याचा लहान भाउ सैयद नाजीम सैयद रउफ वय ४० वर्षे रा. मिटणापुर हा मिटणापुर शिवारातील बेबंळा धरणाचे कॅनाल कडे दुपारी ०३/०० वा दरम्यान म्हशी चारण्यास गेला असता सांयकाळी ५/०० वा तो कॅनाल जवळ जखमी अवस्थेत पडून असल्या बाबत माहिती मिळाल्याने त्यास प्रथम शासकीय रूग्णालय बाभुळगांव येथे उपचार करून रेफर केल्याने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान रात्री १०/०० वा. तो मरण पावला वरून फिर्यादीचे मृतक भाउ सैयद नाजीम यांस कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्याराने छातीवर, बगलीखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठारकेले अशा फिर्यादीचे रिपोटवरून पो.स्टे. बाभुळगांव येथे अप.क ०२४६/२५ कलम १०३ (१) भारतीय न्यासहीता प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद असुन तपासावार आहे.

सदर तपासात मा.पोलीस अधिक्षक सा.यवतमाळ यांनी गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ चे पथकाला आदेशीत केले वरून गांवातील गोपनिय माहिती संकलीत करण्यात आली या मध्ये एक ते दिडवर्षापूर्वी मृतक यांचा त्याचे शेजारी जाबीर मुल्ला यांचे म्हशीला काठी मारण्यावरून वाद झाला होता. व मृतक यांने जाबीर मुल्ला यास थापड बुक्याने मारहान केली होती. तेव्हा पासुन त्याचे आपसात पटत नव्हेते व बोलचाल बंद होती या माहिती वरून यवतमाळ उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. दिनेश बैसाने व मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थागुशा यवतमाळ यांचे मार्ग दर्शनात मृतकचे शेजारी जाबीर मुल्ला यांचा मुलगा नामे युनूस मुल्ला यांस ताब्यात घेवून पो.स्टे. बाभूळगांव येथे आणून सर्व कौशल्य पणाला लावून त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने दिनांक १४/०४/२०२५ रोजी दुपारी ३/३० वा. मृतक सैयद नाजीम हा त्याचे म्हशी शेताचे जवळील कॅनालवर चारत असताना दिसला वरून व त्याचे सोबत पुर्वी झालेल्या वादावरून व मृतक यांने वडीलास केलेल्या मारहानीचा मणात राग ठेवून त्याचे जवळील धारदार लोखंडी विळयाने व काठीने मृतक चे छातीवर, बगलेखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठारकेल्याची कबुली दिली. सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून अज्ञात आरोपी विरूध्द दाखल खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघडकीस आणुन आरोपीस पुढील तपसा कामी पो.स्टे. बाभुळगांव यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ श्री. सतिश चवरे व श्री. लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, पालीस अंमलदार सफौ/सै. साजिद, सफौ/बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली, पोहवा/योगेश डगवार, पोशि/आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, चापोहवा/योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *