डिटेक्शन ब्रांच (DB) उमरखेड यांची कारवाई


मा. पोलीस अधिक्षक सा. यांच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि.27/03/2025 रोजी डिटेक्शन ब्रांच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे सोबत डी बी पथक यांनी गुन्हेगारी शोध अवैध धंदे कारवाई पाहीजे असलेले आरोपी कामी उमरखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड अप क्र 258/2024 कलम 109,121 (1),324(4),3(5) BNS मधील फरार आरोपी नामे शेख सुलतान शेख अल्लावली वय-28 वर्ष, रा. सुकळी (ज) ता.उमरखेड हा बोथा कडुन सुकळी कडे प्लसर मो सा वर येत आहे. अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोउपनि सागर इंगळे, पोउपनि राजेंद्र काळे, पोहेका/2218 लक्ष्मण पवार, पोशि/1652 संघशील टेंभरे, चापोशि/964 आकाश पवार असे रवाना होवुन सुकळी गावाच्या बाहेर बोथा कडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी करुन प्लसर मो सा थांबवली असता तो मो सा तेथेच सोडुन पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे. सदर इसमावर उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे इद्दपार प्रकरण चालु असुन त्याचेवर पोलीस स्टेशन उमरखेड येथे जबरी चोरी, विनयभंगाचे, शरीराविरुध्दचे तसेच जातीय गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड यांचे ताब्यात दिले आहे.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बी जे हर्षवर्धन सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पोउपनि सागर इंगळे, पोउपनि राजेंद्र काळे, पोहेका/1218 लक्ष्मण पवार, पोशि/1652 संघशील टेंभरे, चापोशि/964 आकाश पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *