तिन जोडप्यांचा संसार सुखाचा झाला;

एकुन 67,58,985 लाख रुपयांची थकीत रक्कमेची वसुली

(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)
आता सर्वात मोटी बातमी सावनेर मधुन सावनेरचे दिवाणी न्यायालय
वरिष्ठ स्तर, सावनेर येथे दिनांक 10 मे
2025 रोजी महालोक अदालतीचे
आयोजन करण्यात आले. सदर लोक
न्यायालयात घरपटटी, पाणीपटटी, बँक, बिएसएनएल, एमएसईबी, खटलापुर्व तडजोड प्रकरणे, वैवाहिक तसेच कौटुंबीक प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. सदर लोक न्यायालयात एकुण 7272 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या
पैकी 1266 प्रकरणे निकाली निघाली
असुन सदर प्रकरणातुन एकुण
67,58,985 थकीत रक्कमेची वसुली
करण्यात आली.


सदर लोक न्यायालयामुळे एकुण तिन
जोडप्यांचा संसार सुखाचा झाला. सदर
लोक न्यायालया करीता मा.एस.ए.
सरदार, दिवाणी न्यायाधीश व. स्तर,
सावनेर, मा. एस.आर. भरड, सह
दिवाणी न्यायाधीश क. स्तर, सावनेर,
तथा मा. एस. एम. गाडे, तिसरे सह
दिवाणी न्यायाधीश क. स्तर, सावनेर
यांचे एकुण तिन पॅनल गठीत करण्यात
आले होते. सदर पॅनल वर सदस्य
अधिवक्ता म्हणुन ए. जे. मुलमुले आणि
बि.एम. पुरे यांनी काम पाहीले. तसेच
सदरहू लोकअदालत यशस्वी करण्या
करीता तालुका बार असोसियेशन,
सावनेर आणि सर्व न्यायालयीन
कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य प्रदान
केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *