उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील
यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची निवड झाली असून
पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना या निवडीचे पत्र दिले असून. या पत्रात म्हटले आहे की , डिजिटल पत्रकारांची भारतातील पहिली संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुरस्कार निवड समितीने महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कारसाठी त्यांची निवड केली आहे.मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करीत असलेले काम समाजाला व नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य आपण करता. कोरोना काळात आपण बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. आपल्या याच योगदानाची दखल घेऊन आपल्याला उपरोक्त पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कोठारी यांना रविवार दिनांक २५/५/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथे ग्राम विकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अध्यक्ष आयुष्यमान भारत महाराष्ट्र समिती डॉ. ओम प्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बहाल करण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना एकुण ७५ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124