
जामखेड प्रतिनिधी
दि. 28 मे
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या संकल्पनेतुन व गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित चोंडी येथे स्वच्छता करत महिला बचत गटाच्या माध्यमातुन स्वच्छता मोहीम व श्रमदान शिबीराच्या माध्यमातुन साफसफाई करत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून स्वच्छता करण्यात आली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर याच्या त्री शताब्दी जयंती निमित्त जामखेड तालुक्यातील सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ जवळा यांनी दि 27 मे रोजी चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना म्हणून चोंडी येथील स्मारक परिसरामध्ये श्रमदान करून स्वच्छता राबवली व महिलांना स्वच्छते बरोबरच एकतेचा संदेश दिला. यावेळी बी एम् धोत्रे सर, सी सी आकाश सर, सी एल एम डॉ. अर्जुन मोहळकर, सी टी सी सौ मनीषाताई मोहोळकर, माया आव्हाड, राणीताई रंधवे, प्रतिभा जगदाळे, पूजा सुतार, अर्चना गव्हाळे, छाया कापसे, ताई ढवळे, स्नेहल शिरसाट, दिपाली बांदल, अनिता कुलकर्णी, सुरेखा कोळपकर, मालनताई कचरे, सुनीताताई लोंढे आदि महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. शेवटी या कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे डॉ.अर्जुन मोहळकर यांनी आभार मानले.
नंदु परदेशी
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124