वन अधिकारी यांच्या हलगर्जीपणा व टाळाटाळ यामुळे वेतन रखडल्याचा दावा..

जामखेड प्रतिनिधी
दि 3 जुन

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे शासनाची वन विभागाच्या अधिकाराने गेल्या सात ते आठ वर्षापासून रोपवाटीका चालु असून सदर रोप वाटिकेमध्ये डोणगाव येथील गरीब दलीत कुटुंबातील सुभाष धनवे व त्यांच्या पत्नी सौ उषा धनवे रोपवाटीका चालु झाल्या पासुन आजतागायत कार्यरथ असून पोटच्या लेकरा प्रमाणे रोपांची काळजी घेऊन रोपवाटीका सांभाळत आहेत व आजही तेच सर्व जबाबदारीने आपले काम करून सर्व रोपांना खत पाणी घालून निगा करत रोपे वाढवून मोठी करत आहेत. याच रोपवाटीकेतुन अनेक ठिकाणी रोपे पुरवली जात असून वृक्षारोपन वाढीस मदत झाली आहे मात्र या कष्टकरी वनमजुराकडे संबंधीत अधिकारी जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे उभय पती-पत्नीच्या वतीने सांगण्यात येत असून दोघेहि पती-पत्नी पगाराची प्रतिक्षा करत आपल काम इनामे इतबारे करत आले आहेत.

कर्जत जामखेड विभागाचे वन अधिकारी शेळके सह इतर अधिकारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून संबंधीत अधिकारी यांनी मध्यंतरी काही वेळा कसे बसे त्यांना त्यांचे वेतन दिले. मात्र आता मात्र ते देण्यास टाळाटाळ करत असून नुसती आश्वासनाची पाने त्यांच्या तोडाला पुसता आहेत. तर काही वेळा त्यांनी 11-11 महिन्याचे मस्टर काढले व या वन मजूरांचे इतर कुठल्या तरी योजनेतुन 6-6 महिन्याचे पगार दिले. मात्र गेल्या सात वर्षापासून इतर ठिकाणच्या कोणत्याच वन मजुरांचे पगार राहिलेले नसताना या धनवे कुटुंबियाचाच पगार का केला जात नाही, असा सवाल उत्पन्न होत आहे.

वरील दोनी पती पत्नी म्हणजेच सुभाष यमाजी धनवे व सौ उषा सुभाष धनवे यांचे गेल्या सहा महिन्याचे पगार का थकले हाच खरा प्रश्न असून कर्जत जामखेड विभागाचे मुख्य वन अधिकारी मोहन शेळके साहेब यांनी जाणूनबुजून पगार केलेले नाहीत. असे पती पत्नीच्या माध्यमातुन सांगितले जात आहे.

मोहन शेळके साहेब, उभाळे साहेब, सफकाळ साहेब हे डोणगाव रोप वाटिका येथे येऊन वन मंजूर सौं. उषाबाई सुभाष धनवे यांना सांगतात की, तुमचा आज पर्यंत कोणत्याच महिन्याचा पगार ठेवला नाही, आणि ठेवणार ही नाही. मी तुमचा पगार कुठूनही काढून देईल पण आज पर्यंत 6 महिने झाले त्यांनी काय पगार दिला नाही.

आज डोणगाव रोपवाटिका येथे 35 हजार रोप आहेत ते कसे जगणार. आता डोणगाव रोप वाटिका येथे दोनच वन मंजूर काम करतेत. ते दोघेच 35 हजार रोपांना पाणी घालतेत. व उभाळे साहेब वनपाल यांनी सांगितले वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलं आहे सॉर्टींग करून घ्या. रोप खाली चालले आहेत तुम्ही सॉर्टींग करून घ्या , आज सॉर्टींग चालू आहे, आणि तुमचा पगार आज पर्यंत कोणता ठेवला नाही ठेवणारही नाहीत. तरी देखील 6 महिन्याचा पगार रखडला आहे.

या सर्व बाबीचा शासनाने विचार करून वरील वन मजुर यांना न्याय देत वेतन द्यावे अन्यथा दोन्ही पती पत्नी तिव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *