NANDED | नांदेडचा सुप्रसिद्ध असलेला सहस्त्रकुंड धबधबा रात्री झालेल्या दमदार पावसाने प्रवाहित
- नांदेडच्या किनवट तालुक्यातच नव्हे, तर नांदेडसह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता.
- किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्री दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन, धो धो व्हायला सुरुवात झाल्याने हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असल्याचे दिसून येत आहे.
- सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूने पैनगंगा अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूने वन विभागाचे निसर्ग पर्यटन संकुल असल्याने या सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये अजूनच सौंदर्याची भर पडत आहे. त्यातच वेली फुलांनी नटलेला हा परिसर आणि पक्षांच्या किलबिलाटाने या सहस्रकुंड धबधब्याला अजूनच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ हे पर्यटकांसाठी एक नयन रम्य स्थळ आहे.
असे हे नैसर्गिक नयन्य रम्य स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले आता या सहस्त्रकुंड धबधब्याकडे वळताना दिसून येत आहेत.