फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे काढण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ परभणकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ बेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ धनश्री जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ कविता यादव,डॉ देवकी सोमभोयर यांचे मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर रविंद्र दाभाडकर,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पवार मोहाडे,आरोग्य सहाय्य्क वानखडे, गोपणारायण ,आरोग्य सेवक पवार झ्याटे,मुळे ,उपचार पर्यवेक्षक संतोष बल्हाळ गटप्रवर्तक मोडक भगत वाहनचालक मच्छिन्द्र मदने,गणेश राऊत, परिचर मनिष जाधव ,बायस्कार, गव्हाणे तसेच आशा कार्यकर्ते ऊपस्थीत होते.सर्वाच्या सहकार्याने वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 87 संशयिताचे एक्स रे काढले तसेच 80 संशयीतांचे स्पुटम गोळा करण्यात आले.शिबीराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले.उपस्थितांना क्षयरोग,डेंगू बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.अनेक रोगाबद्दल माहिती गवळी यांनी उपस्थित रुग्णांना रोगाबद्दल मार्गदर्शन केले तसेच रोगाची बद्दल लक्षणे व त्यावर उपचार किती गरजेचे आहे हे त्यांनी पटवून दिले तसेच या उपचाराबद्दल उपस्थित रुग्णांनी या टीमचे अभिनंदन केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206