सावळी सदोबा येथे समाधान शिबिर

आमदार राजु तोडसाम यांची उपस्थिती

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा‌ येथे दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार रोजी 11 वाजता साई मंगल कार्यालय सावळी सदोबा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे .
या समाधान शिबिरात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, महिला व बालकल्याण विभाग, निम्न पैनगंगा प्रकल्प विभाग, कृषी विभाग,बचत गट या विभागाचे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहून आप आपल्या विभागाशी संबंधित तक्रारी व अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील तसेच घरकुल योजना, नवीन विहिरी मंजूर, आधार कार्ड अपडेट,राशन कार्ड , श्रावणबाळ बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील व लेख लाडकी योजना, लाडकी बहीण योजना यातील अनेक समस्या व अडचणी आणि लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी या समाधान शिबिरात प्रयत्न केले जातील.
सावळी सर्कलमधिल ज्या ज्या गावातील तेथील लोकांच्या अडचणी असतील त्या त्यांनी लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात किंवा गावातील पटवारी, ग्रामसेवक यांच्याकडे कळविल्यास या समाधान शिबिराच्या दिवशी तिथेच त्याचे उत्तर मिळेल.
या समाधान शिबिराला आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.श्री. राजूभाऊ तोडसाम, आर्णी तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती, पाणी पुरवठा विभाग आणि महावितरणचे अभियंता व अधिकारी वर्ग तसेच इतर सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आर्णीचे तहसीलदार श्री.वैशाख वाहूरवाघ यांनी दिली आहे.

रफीक सरकार आर्णी यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *